धाराशिव (प्रतिनिधी)- “डॉक्टर्स डे“ च्या  निमित्ताने रोटरी  क्लब उस्मानाबाद,  वुमेन्स डॉक्टर विंग, आय.एम.ए धाराशिव, यांच्या  संयुक्त  विद्यमाने  शासकीय  वैद्यकीय  महाविद्यालय, धाराशिव येथे  रक्तदान  शिबिराचे  आयोजन  केले  होते.

शिबिराचे  उदघाटन  डॉ. इस्माईल मुल्ला, सिव्हिल सर्जन यांच्या हस्ते करण्यात आले.  ह्या  शिबिरामध्ये 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  ह्या  कार्यक्रमासाठी  रोटरी क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष  डॉ. श्रीराम  जिंतूरकर,  सचिव आनंद  कुलकर्णी,  धनंजय  वाकुरे, माजी जिल्हा प्रांतपाल रवींद्र साळुंके, डॉ. अनार साळुंके, संजय देशमाने, प्रविण  काळे,  बाळासाहेब  देशमुख,  सूरज  कदम , चित्रसेन राजेनिंबाळकर, चंदन  भडंगे, कुणाल  गांधी, डॉ. अभय  शहापूरकर, डॉ. मेघश्याम पाटील, राजेश कदम, सुश्रूत डंबळ,  डब्ल्यु डी डब्ल्यु आयएमए अध्यक्षा डॉ. कौशाली राजगुरू, डॉ. श्रद्धा  मुळे,  अध्यक्ष  डॉ.  सचिन  देशमुख, डॉ. खिस्ते मॅडम यांची  प्रमुख  उपस्थिती  होती.  ह्या  कार्यक्रमासाठी बीटीओ डॉ. लोंढे, डॉ. साबळे  आणि  रक्तपेढीतिल सहकारी  यांचे  सहकार्य  लाभले.  तसेच  रोटरी  क्लब  उस्मानाबादच्या  वतीने  उपस्थित  डॉक्टर्स  आणि  शहरातील  ज्येष्ठ  डॉक्टर्स ह्यांचा  सत्कार  करण्यात  आला.

 
Top