तेर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील अशासकीय समितीचे पदाधिकारी जाहीर करण्याची मागणी भारतीय किसान मोर्चाचे तेर शाखेचे सचिव राहूल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,महायुतीची राज्यात सत्ता येऊन अनेक वर्षे झाले तरी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील अशासकीय समितीचे पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले नाहीत.भाजप पक्षासी  एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्ते यांनाच अशासकीय समितीचे पदाधिकारी करावे व एका व्यक्तीस एकच पद द्यावे अशी मागणी भारतीय किसान मोर्चाचे तेर शाखेचे सचिव राहूल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यावेळी महादेव खटावकर, रियाज कबीर, अमोल थोडसरे, फैसल काझी, मंगेश पांगरकर, नामदेव कांबळे, सोमनाथ भोरे, मुसेफ काझी आदी उपस्थित होते.

 
Top