धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयामधून पालखी सोहळा श्री. क्षेत्र पंढरपुर येथे जाणाऱ्या पालख्या 4 जुलै 2024 पासून येत आहेत.या पालखी सोहळयामध्ये श्री. गजानन महाराज पालखी शेगाव, श्रीमंत.संत एकनाथ महाराज पालखी पैठण,  श्री.विठ्ठल रुक्मीणी पालखी कोढाण्यपूर, विदर्भ व  मुक्ताई नगर पालखी सोहळा या चार प्रमुख पालख्यासह लहान मोठ्या पालख्या (दिंडी) जिल्हयातून जात असल्यामुळे यामध्ये हजारो वारकरी, भावीक भक्त सहभागी होतात. तसेच त्यांचे मुक्कमाची एकूण 16 ठिकाणे आहे. चार वेगवेगळी मार्ग आहेत. त्यामुळे 2 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालनात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक,तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व अन्न व औषधी विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.

पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्याकडून वारकरी, भावीक भक्त यांना जलजन्य आजारापासून सुरक्षीत ठेवण्याकरीता सर्व पालखी मार्गावरील पूर्ण गावे तसेच हॉटेल, धाबे, टॅकरच्या पाणी स्त्रोतांची ओ.टी टेस्ट आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घेण्यात आले आहेत. दुषीत आढळून आलेल्या पाणी स्त्रोतांचे तात्काळ निर्जंतुकीकरण करुन परत ओ.टी टेस्ट घेण्यात आले. पुन्हा दुषीत आल्यास ते पाणी नमुणे तपासणीस जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेस पाठविले आहेत. सबंधीत ग्राम पंचायत, नगर परिषद, नगर पालिका यांना कविण्यात आले असून त्याचा पिण्यासाठी वापर करु नये असे कळविले आहे.

मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी महिला वारकरी भावीक भक्तांकरीता हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका यांची मदत घेतली जाणार आहे. 

अशी माहिती जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. सतिष हरिदास व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला, तुळजापूरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.चोरमले, डॉ.कुलकर्णी उपस्थीत होते. उपस्थितांचे आभार सहायक जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा बांगर यांनी मानले.

 
Top