धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे 1 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या लोकशाही दिनात एकूण 17 तक्रारी विविध विभागाशी संबंधित प्राप्त झाल्या. यामध्ये तहसील कार्यालय धाराशिवच्या 5, तहसील कार्यालय तुळजापूरच्या 2, मुख्याधिकारी,नगरपरिषद धाराशीवच्या 2, पोलीस अधीक्षक कार्यालयाची 1, कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्गाची 1, जिल्हा परिषद धाराशिवशी संबंधित 4, मुख्याधिकारी नळदुर्गची 1 आणि एक तक्रार नगरपालिका प्रशासनाशी संबंधित आहे.

प्राप्त तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जून 2024 अखेर आयोजित लोकशाही दिनात एकूण 63 तक्रारी प्रलंबित आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या 2,पोलीस स्टेशन लोहारा 2, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद 12, अधीक्षक अभियंता,महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी धाराशिव 8, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण अधिकारी 1, मुख्याधिकारी,नगरपरिषद धाराशिव 5,अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 1, मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर 2, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धाराशिव 3, जिल्हा आरोग्य अधिकारी 1, जिल्हा कृषी विकास अधिकारी 1, जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी 2, मुख्याधिकारी नगरपरिषद नळदुर्ग 2, नगरपालिका प्रशासन धाराशिव 4, अधिक्षक,भूमि अभिलेख 11 उपअधिक्षक,भूमि अभिलेख कळंब 2, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 1, विभागीय वनाधिकारी 1, कार्यकारी अभियंता,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 1 अशा एकूण 63 लोकशाही दिन अर्ज प्रलंबित आहे.

 
Top