धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील शिकाऊ उमेदवार भरती सन 2024-25 करिता फक्त ऑनलाईन पध्दतीने 4 जुलै ते 11 जुलै दरम्यान अर्ज मागविले आहे.

आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन  MSRTC Division Osmanabad या आस्थापनेत  Establishment Code- E 03172700669या करीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे. अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक उत्तीर्ण उमेदवारांनी NATS-2.0 पोर्टलवरील  www.nats.education.in या वेबसाईटवरुन  MSRTC OSMANABAD Division  या आस्थापने (Establishment) करीता  Establishment Code- WMHOSC00001 ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.रजिस्ट्रेशन केलेल्या अर्जाची प्रत व अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक तसेच आयटीआय उत्तीर्ण संपूर्ण वर्षांचे शैक्षणिक कागदपत्रे 12 ते 16 जुलै-2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ,राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय,धाराशिव येथे जमा करावीत.या कागदपञासोबत भरती प्रक्रिया शुल्क म्हणुन खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये अधिक जी एस टी 186 (एकुण 590 /- व मागासवर्गीय उमेदवारांनी रु 250 + जी एस टी 18 टक्के (एकुण-295) चा राष्ट्रीयकृत बँकेचा डिडी अथवा पोस्टल ऑर्डर  MSRTC FUND ACCOUNT  PAYABLE AT OSMANABAD   यांचे नावे काढून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. डिडी अथवा पोस्टल ऑर्डरच्या मागे उमेदवाराने त्याचे नाव व अर्ज केलेल्या पदाचे नाव लिहणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय उमेदवाराने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.उमेदवाराने जमा केलेले भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. 

प्रशिक्षणार्थी उमेदवाराचे Ekyc आधारकार्ड राष्ट्रीयकृत बँकेत लिंक असणे आवश्यक आहे.भविष्यात राष्ट्रीय उमेदवारीअंतर्गत दावे सादर करतेवेळी अडचणी येणार नाहीत. तसेच प्रोफाइल 100 टक्के पुर्ण करणे बंधनकारक आहे.कागदपत्र तपासणीवेळी कागदपत्र पडताळणी समितीस सर्व मुळ कागदपत्रे दाखविणे बंधनकारक आहे.(उदा. शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रके, आधारकार्ड,जातीचा दाखला इत्यादी) 

जाहिरातीमध्ये दर्शविलेला ट्रेड व भरलेला ट्रेड तपासणे आवश्यक आहे, चुकीचा ट्रेड टाकल्यास अर्ज रदद समजला जाईल,याची नोंद घ्यावी. (जागेचा तपशील -मोटार मेकॅनिक व्हेईकल -52 जागा, ॲटोइलेक्ट्रीकल / इलेक्ट्रेशियन- 09 जागा,मेकॅनिक ऑटोइलेक्ट्रीकल अँन्ड इलेक्ट्रॉनिक्स 03 जागा,पत्रे कारागीर (शीट मेटल)-11 जागा, वेल्डर 02, मेकॅनिक (रेफ्रिजरेशन  एअरकंडिशनर)-02 डिझेल मेकॅनिक -02 अभियांत्रिकी पदवीधर 01 जागा व अभियांत्रिकी पदवीकाधारक 01 जागा) अशा एकुण-83 जागा आहेत. 

जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे संपर्क साधावा.असे आवाहन विभाग नियंत्रक,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,धाराशिव यांनी केले आहे.

 
Top