धाराशिव (प्रतिनिधी)-आर्य चाणक्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न झाले. यात पर्यावरणाचा संदेश देणारी नाटिका, पारंपारिक वेशभूषा यासह नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाळेतील माजी विद्यार्थिनींचा सत्कार संपन्न झाला. यावेळी लोकसेवा समितीचे सचिव कमलाकरराव पाटील उपस्थित होते. 

वर्धापन दिनानिमित्त शाळेत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. पर्यावरणावर संदेश देणारी नाटिका इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी 'आर्य चाणक्य'यांच्या विषयी माहिती सर्व वर्गात जाऊन सांगितली.प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्धापन दिनानिमित्त भाषण केले. इयत्ता सहावी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम घेतले. यावेळी शाळेतील विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते. यावेळी आर्य चाणक्य विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कुमारी काजल ननवरे हिचा मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कुमारी कु.रिया रामचंद्र घाडगे हिला नीट परीक्षेमध्ये 591 गुण मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मनिष देशपांडे  यांनी केले. शाळेतील उपक्रमाबद्दल गायकवाड यांनी माहिती सांगितली. तर सुत्रसंचालन जगताप सर यानी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार माळी सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.


 
Top