नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी नगरपालिकेत दि. 4 जुलै पासुन “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कक्ष “ सुरु केले आहे. हा कक्ष सुरु झाल्यानंतर गेल्या दोन दिवसात 210 अर्ज दाखल झाले आहेत.

राज्यातील महायुतीच्या सरकारने राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना“ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी कांही जाचक अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना या योजनेचा लाभ सुलभापणे मिळावा. यासाठी ज्या जाचक अटी होत्या त्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदतही वाढवुन दिली आहे. त्यामुळे महिलांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

सुरुवातीला या योजनेसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करण्याचा नियम होता. मात्र तोही नयम बदलुन आता महिलांना ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.

धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नळदुर्ग नगरपालिकेत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कक्ष सुरु केले आहे. शहरातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज या कक्षामध्ये दाखल करता येणार आहे. या कक्षामध्ये मुश्ताक पटेल व सुरज काळे हे नगरपालिकेचे कर्मचारी महिलांचे परीपुर्ण अर्ज दाखल करून घेत आहेत. नगरपालिकेत का कक्ष सुरु झाल्यानंतर गेल्या दोन दिवसात 35 अर्ज दाखल झाले आहेत. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी नगरपालिकेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कक्ष सुरु केल्याने शहरातील महिलांची मोठी सोय झाली आहे.

 
Top