ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील पोलीस स्टेशन समोर असलेल्या गजानन मार्केट मधिल आजोबा गणपती मंदिरचा कलशारोहन सोहळा विविध धार्मिक विधी मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
ढोकी येथील गजानन मार्केट मध्ये असलेल्या आजोबा गणपती मंदिरावरील कलश लेकमाता यांनी दिलेल्या योगदानातून गुरु पौर्णिमानिमित्त आयोजित कार्यक्रम मध्ये कळशाची स्थापना करण्यात आली. शनिवारी ढोकीत पुणे येथून आणलेल्या कलशाची गावातून नगर प्रदिक्षणा काढण्यात आली. या वेळी मोठया संख्येने महिला, पुरुष सहभागी झाले होते. शनिवारी रात्री हभप देविदास महाराज हौळ निवळीकर यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमांस पौरोहित्य मुकुंद जोशी, वैभव जोशी, वामन महाराज, व्यंकट जोशी, सतीश जोशी, अमृत जोशी, यांनी मंत्रोच्चार, होम हवन या सह धार्मिक विधी पार पाडले. या वेळी यजमान म्हणून राजपाल देशमुख, अमर समुद्रे, पंकज दंडनाईक, अशोक गुरव, नितीन घोडके, तिरु भोळे, गणेश इंगळे, सोमनाथ सूर्यवंशी, या दम्पत्या हस्ते विधिवत पुजा करण्यात आली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ढोकीसह परिसरातील महिला, पुरुष यांच्या सह गजानन मार्केट मधील सर्व व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.