कळंब (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडवावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ.मैनाक घोष व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहीती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात डाँ. मैनाक घोष व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी डाँ. घोष यांनी शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने शिक्षकांच्या अशासकीय कपाती मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यापेक्षा गटशिक्षणाधिकारी स्तरावरुनच संबंधित पतसंस्थेला देण्यात याव्यात, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावेत, शैक्षणिक वर्ष 2020-2021 व शैक्षणिक वर्ष 201-2022 आदर्श शिक्षकांचे प्रलंबित पुरस्कार वितरीत करावेत, विनंती केलेल्या पदवीधर शिक्षकांना पदावन करुन भाषा व सामाजिक शास्र विषयाच्या प्राथमिक पदवीधर शिक्षक,शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरावीत, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी जिल्हा व तालुकास्तरावर निवड झालेल्या शाळेंना पुरस्कार देऊन सन्मानित करावे, मुळ सेवापुस्तिका व दुय्यम सेवापुस्तिका अद्यावत करण्यासाठी तालुकास्तरावर कँम्प लावावा, गोपनिय अहवालाची दुय्यमप्रत शिक्षकांना दिली जावी, ज्या ठीकाणी शाळेची जागा शाळेच्या नावावर नाहीत त्या जागा शाळेच्या नावावर कराव्यात इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ.मैनाक घोष व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सर्व प्रश्न 15 आँगस्ट पुर्वी निकाली काढले जातील असे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात बाळकृष्ण तांबारे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मोहन जगदाळे, अध्यक्ष शेषेराव राठोड, जिल्हाप्रवक्ते उमेश भोसले,धाराशिव तालुकाध्यक्ष राहुल भंडारे,कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार,कार्याध्यक्ष प्रशांत घुटे, सरचिटणीस विक्रम लोमटे,पतसंस्थेचे संचालक अमर गोरे,सुनिल गपाट,काशिनाथ सुरवसे, शिवाजी दराडे,नितिन ढगे, सुधाकर कावळे,रमेश शिंदे हे पदाधिकारी उपस्थित होते.