ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तुगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपली असल्याने सन 2024 ते 2026 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी पालकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी नूतन शालेय व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले. समितीच्या नूतन अध्यक्षपदी राजेंद्र सुभाष डोंगरे व उपाध्यक्षापदी प्रिती स्वप्नील हाजगुडे यांची निवड करण्यात आली.
तर समितीच्या सदस्यपदी मीरा बालाजी शितोळे, पूजा खंडू कोळी, संगीता सूर्यकांत भुतेकर, स्वप्नाली हनुमंत शेंडगे, विलास तुकाराम भुतेकर, समाधान सुनिल पाटील, दत्तात्रय चांगदेव भुतेकर तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी अनिल शहाजी भुतेकर व शिक्षणतज्ञ सदस्य सचिन नवनाथ लोमटे यांच्या नूतन समितीवर निवडी करण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा जि. प. शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी पदाधिकारी अध्यक्ष शंकर भुतेकर, सदस्या रेश्मा उमाकांत भुतेकर, माजी सरपंच शिक्षणप्रेमी सदस्य नंदकुमार देविदास भुतेकर यांचा ही सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव यांच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रमोद अनपट, प्रमुख पाहुणे तुगांव गावचे सरपंच किशोर मारुती शेंडगे व केंद्रप्रमुख जगदीश जाकते हे उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी तुगांव येथील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक बाहुबली नवले,नवनाथ बचाटे, अमोल वैद्य, नामदेव डुकरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवदास चौगुले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पडवळ यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार सुलभकुमार भगत यांनी मानले.