कळंब (प्रतिनिधी)-तालुक्यातील खोदंला येथे जलजीवन मिशनचे काम अनेक दिवसापासून कासवगतीने सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराने गावातील पूर्ण रस्ते उघडून टाकले. पावसाळ्यात या रस्त्याची पूर्ण वाट लागून मोठमोठे खड्डे तयार झाले. या खड्ड्यात अनेक वृद्ध नागरिक, शाळकरी मुले पडून जखमी झाल्याने गावातून तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. याकडे गुत्तेदाराने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. 

खोंदला  गावात केंद्राच्या जलजीवन मिशनचे काम सुरू असून हे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. या कामाकडे अधिकारी ना ठेकेदार वेळेवर लक्ष न दिल्यामुळे गावातील पूर्ण रस्ते उकडून टाकला गेला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्याने मोटर सायकल जात नाही. तर पायी जाणाऱ्या वृद्ध नागरिक, शाळकरी मुलांना, महिलांना याचा मोठा त्रास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  या खड्ड्यात अनेक जण आपटून जखमी झाले आहेत. याकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसात हे रस्ते पूर्ण न झाल्यास गावकरी आंदोलन करतील असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. याकडे ठेकेदाराने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

 
Top