कळंब (प्रतिनिधी)-रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी, इनरव्हील क्लब कळंब, इंडियन मेडिकल असोसिएशन, केटीएमपीए कळंब यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जाधवर हॉस्पिटल कळंब येथे करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 36 रक्तदात्याने रक्तदान केले.

प्रारंभी शहरातील सर्व डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्ताने सत्कार करण्यात आला. सीए दिन व एस.बी.आय. डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आयएमएचे अध्यक्ष डॉ.शीतल कुंकुलोळ, सचिव डॉ. सत्यप्रेम वारे, केटीएमपीएचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोरे, इनरव्हीलच्या अध्यक्ष्या प्रा. प्रतिभा भंवर, सचिव डॉ.प्रियंका आडमुठे, रोटरीचे नूतन अध्यक्ष अरविंद शिंदे, सचिव अशोक काटे आदी उपस्थित होते. डॉ. रामकृष्ण लोंढे व डॉ. सत्यप्रेम वारे यांनी यांनी डॉक्टर दिनाचे महत्त्व सांगितले.  कार्यक्रमाचे पोजेक्ट चेअरमन डॉ. शैलेश बिदादा, डॉ. प्रियंका जाधवर यांच्यासह रोटरी क्लब कळंब सिटीचे सर्व रोटरियन्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्तात्रय टोणगे यांनी केले. तर आभार  डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी मानले.


कळंब रोटरी क्लब विविध डे साजर करण्यासाठी पैसे खर्च करतात. पण याच दिवशी कृषी दिन असतो, शेतकऱ्याचा सत्कार मात्र हे करत नाहीत. शेतकरी पुत्र असतानाही याचा विसर यांना का पडतो? अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते   बावीकर यांनी दिली.


 
Top