ढोकी (प्रतिनिधी)- अहमदपूर हुन पुणे कडे प्रवाशी घेऊन निघालेल्या एसटी बस व ढोकीहुन मुरुडकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारचा कोल्हेगाव नजीक दि. 30 रविवारी रात्री 7:30 च्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कार मधील दोन जण जखमी झाले आहेत.

या बाबत मिळालेली माहिती अशी की अहमदपूर आगाराची बस एमएच 20 बीएल 0852 ही रविवारी रात्री 45 प्रवाशी घेऊन पुणे च्या दिशेने जात असता ढोकी कडून मुरुड ला जाणारी स्विफ्ट डिझायर कार एमएच 24 एसी 9100 या दोन वाहनाचा कोल्हेगाव येथील पुलावर आले असता समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. सदर अपघातात कार मधील दोन व्यक्ती जखमी झाल्या. तर बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. तर अपघातातील कार मधील दोन्ही प्रवाशी यांना उपचारासाठी धाराशिव येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अपघात कारचे मोठे नुकसान झाले असून प्रत्यक्ष दर्शी  प्रवासी यांनी सांगितले की बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. अपघात हा ऐन नदीवरील पुलाच्या मधोमध घडला असल्याने चालकाचा थोडा जरी हलगर्जी पणा झाला असता तर बस सरळ नदीत कोसळली असती. या अपघातात बस मधील सर्व प्रवासी यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे चालक व वाहक यांनी सांगितले. सदर अपघात हा पाऊस चालू असताना घडला त्यांना पुढील वाहणाचा  व अरुंद पूल याचा अंदाज न आल्या मुळे घडल्याचे प्रवाश्यामधून चर्चा होती. या वेळी घटनास्थळी तात्काळ ढोकी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी जाऊन दोनी वाहने ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक मोकळी केली. या प्रकरणी ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top