कळंब (प्रतिनिधी)- कळंब. तालुक्यातील बोरगाव धनेश्वरी या ठिकाणी कै. कुसुम कालिदास सांगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी इयत्ता पहिली ते दहावी व विविध स्पर्धा परीक्षेतील यशवंताचा गुणगौरव सोहळा शालेय साहित्य देऊन साजरा केला जातो. कै. कुसुम कालिदास सांगळे यांचे चिरंजीव रमेश सांगळे हे चीन या देशांमध्ये मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहेत. मातृभूमीचे ऋण फेडावे व गुणवंताच्या पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी. या उद्देशाने परदेशात असून देखील आपल्या गावची मुले शिकून पुढे गेली पाहिजेत या उदात्त हेतू ने दरवर्षी आईच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांना जवळपास 50 ते 60 हजार रुपयाचे शैक्षणिक साहित्य दरवर्षी मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप केले जाते. या प्रसंगी रमेश सांगळे यांनी शाळेच्या नावे दहा लाख रुपये ठेवी स्वरूपात ठेवून दरवर्षी   येणाऱ्या व्याजा मधुन अविरतपणे गुणगौरव सोहळा व्हावा असे जाहीर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लिंबाबाई हनुमंत सांगळे प्रमुख पाहुणे उद्योजक विठ्ठल माने मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट बाबा चोरघडे, उपसरपंच रामचंद्र सांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत सांगळे, अमर पाटील, किशोर पाटील, अनंत जोशी, काशीनाथ सांगळे, राहुल सांगळे, बालाजी सांगळे,बालाजी चोरघडे,कार्यक्रमाचे प्रायोजक इंजिनिअर रमेश सांगळे, मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चोरघडे, रामचंद्र चोरघडे चेअरमन, हायस्कूलचे मुख्याध्यापक रामदास शिंदे, उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी विठ्ठल माने, राजेंद्र बिक्कड, भारत सांगळे, रामचंद्र सांगळे,रमेश सांगळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ यांनी केले. तर सूत्रसंचालन सुंदर जगताप व आभार प्रदर्शन रमाकांत दीक्षित यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव धनेश्वरी व त्रिंबक त्रिंबकराव पाटील हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने ग्रामस्थ माता पालक उपस्थित होते.

 
Top