धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये  घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सालाबादाप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव प्रशालेने राखली असून तब्बल 35 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता पाचवीतील कु श्रेया शरद क्षीरसागर हिने राज्यात 9 वा क्रमांक पटकावला आहे. 

 इ . 5 वी मधून 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून प्रशालेत प्रथम कु श्रेया शरद क्षीरसागर 276 गुण घेऊन राज्यात 9 वे स्थान पटकावले. तर द्वितीय अन्वी अमित राजे निंबाळकर 250 घेऊन जिल्हयात 12वी. तर तृतीय विपुल विलास खुने 240 गुण घेऊन जिल्हयात 22 वे स्थान पटकावले.

इ . 8 मधून 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून, प्रथम अ.हादी मुदस्सर काझी याने 244 गुण घेऊन जिल्हयात सातवा. तर द्वितीय आयुष हर्षल कुलकर्णी याने 238 गुण घेऊन जिल्ह्यात 8 वा. व तृतीय कु.क्षितीजा अभिजित गोरे 234 गुण घेऊन जिल्हयात 21 वे स्थान पटकावले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्था कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे, श्रीमती बी .बी गुंड, राजेंद्र जाधव यांनी इयत्ता 8 वीचे पर्यवेक्षक तथा विभागप्रमुख एन. एन. गोरे, इयत्ता 5 वीचे पर्यवेक्षक व विभागप्रमुख डी.ए. देशमुख यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व त्यांचे अध्यापक आर. जे.बोबडे, एस.डी क्षीरसागर, ए.सी. माढे, किरण गरड, अमित पाटील, एस.बी.चव्हाण, ए. एच. माने, सौ.  एस.व्ही.लोकरे, डी. यु. ओव्हाळ, के. ए. लोंढे, डी. बी. ढोले, सौ.  एस. एम.राऊत, सौ.  एम पी पवार,  ए. आर. बोपलकर यांचे अभिनंदन केले.

 
Top