धाराशिव (प्रतिनिधी)- एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ग्रामीण प्रकल्प) धाराशिव अंतर्गत येणाऱ्या 26 अंगणवाडीमधील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून निकष,अटी,शर्ती व गुणदान पद्धतीच्या अधिन राहुन विहित नमुन्यात अर्ज मागविले आहे.

ज्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज मागविले आहे,त्या गावांची नावे पुढीलप्रमाणे आहे.घाटंग्री तांडा - 2, चिलवडी,उतमी,कायापूर,झरेगाव, केकस्थळवाडी, शेकापूर, पिंपरी, गावसुद (पारधीवस्ती), बेंबळी, देवळाली, बरमगाव (बु),अनसुर्डा, केशेगाव (कारखाना),बामणी (हाडुळवस्ती), खामसवाडी,वाडी बामणी,भंडारी, पंचगव्हाण,एकनाथवाडी, टाकळी(बे), समुद्रवाणी व राजुरी या गावचा समावेश आहे. या रिक्त असलेल्या मदतनीस पदासाठी 12 जुलैपर्यंत अर्ज कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय,धाराशिव येथे स्वीकारले जाणार आहे. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), एकात्मिक बाल विकास सेवा योजना,प्रकल्प धाराशिव यांनी कळविले आहे.

 
Top