धाराशिव (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे 12 व आठवीचे 10 असे एकूण 22 विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त करत शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.

या शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, मुख्याध्यापक पी. एन. पाटील, उपमुख्याध्यापक एस. पी. मुंडे, पर्यवेक्षक व्ही.के. देशमुख, पर्यवेक्षक ए.के. दिक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. तर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, संस्था सदस्य माजी न्यायमूर्ती संभाजीराव मुंडे, भाई पंडितराव चेडे, निर्मलाताई भांगे यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

सदर शिष्यवृत्ती मध्ये पाचवी वर्गातून श्रेयश बागवाले, आलोक चव्हाण, हर्षवर्धन बोरकर, सार्थक उंबरे, आयुष जाधव, श्रेयश घोळवे, समर्थ सरक, ईश्वरी काळे, अनुराग कुंभार, तन्वी मेंगले, सई गायकवाड, सिद्धी भातलवंडे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. तर आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विराज बाराते, प्रज्वल शिनगारे, रजनीश वैकुंठे, संस्कृती घोडके, आदित्य चौधरी, श्रावणी घोडके, समाधान खटके, अक्षरा कपाळे, अनुष्का जाधव, समाधान चौरे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.

विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या गुणवत्तेचा वारसा पुढे चालवावा, स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे गरजेचे आहे असे अध्यक्षिय भाषणात श्रीमती शशिकलाताई घोगरे यांनी बोलताना विद्यार्थ्यांना आवाहन केले.

भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी शिष्यवृत्ती परीक्षांच्या माध्यमातून होते. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षेला स्वीकारत यश संपादन केले पाहिजे असे संस्थेचे कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख यांनी बोलताना सांगितले.

तर विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येय प्राप्तीसाठी गुरुजनांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून उज्वल भविष्याचे ध्येय साध्य करावे असे सचिव भाई धनंजय पाटील यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना आवाहन केले.

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती विभागात विभाग प्रमुख म्हणून डी.व्ही. घाटराव, सहकारी शिक्षक म्हणून एस. बी. कोकाटे, एस. एन. चौरे, जे. पी. गिते तर पूर्व माध्यमिक विभागात विभाग प्रमुख म्हणून एस. डी. नागलबोणे, सहकाही शिक्षक म्हणून ए. एम. वीर, एम. ए. मोहिते, प्रशांत शेळके यांनी काम पाहिले.  सदर प्रसंगी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ए. एम. वीर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 
Top