उमरगा (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवाच्या कार्यालयीन विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी दिव्यांग बांधवांच्या अडचणींबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या सोडवणेबाबत चर्चा केली. यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. 

दिव्यांग बांधवाच्या कार्यालयीन विविध समस्या व अडचणी सोडवण्यासाठी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेटमंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.4) उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. सदर मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांनी त्यांच्या वाट्याचा 5 टक्के शासकीय निधी ग्रामपंचायत खर्च करत नाहीत. चार ते पाच महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या पगारी मिळाल्या नसल्याने आर्थिक परवड होत असल्याबाबत व्यथा मांडण्यात आल्या. तसेच घरकुल मिळत नसल्याच्या तक्रारी, रेशनकार्डाची मागणी वारंवार करुनही संबंधीत विभागाकडून रेशन कार्ड मिळत नसल्याच्या समस्या बहुसंख्य दिव्यांग बांधवांकडून सातलिंग स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सातलिंग स्वामी यांनी उमरगा व लोहारा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या सोडवणेबाबत चर्चा केली. यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. सदर बैठकिस उमरगा-लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी एक वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत सुरू होती. सदर बैठकीनंतर उपस्थित दिव्यांग बांधवांसाठी पाणी, चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

 
Top