धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद वाघोली तालुका जिल्हा धाराशिव या शाळेत गुरुपौर्णिमा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी सर्वप्रथम इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक माने यु.सी. तर प्रमुख पाहुणे म्हणून कवडे एस. एस., कटके एन. यु., सूर्यवंशी एस. व्ही., पाटील एस. एम., धाबेकर आर. एच., सोनाली माळी या उपस्थित होत्या. शाळेतील सेवक कांबळे मामा व लिपिक खडबडे सर यांचीही स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका कवडे एस. एम. यांनी सर्व विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. माने सर यांनी गुरु कसे मार्गदर्शक ठरतात याबद्दल मार्गदर्शन केले. धाबेकर मॅडम यांनीही गुरुपौर्णिमेचे महत्त्व याबद्दल सर्व सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला व शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.


शिक्षक सप्ताह हा 22 जुलै ते 28 जुलै या कालावधी नियोजित करण्यात आला आहे. शिक्षक सप्ताह उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशाला वाघोली तालुका जिल्हा धाराशिव या शाळेत उत्साहाने सुरुवात करण्यात आली. पहिला दिवस अध्ययन ,अध्यापन साहित्य निर्मिती, दिवस टाईम डे सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध नवीन नवीन साहित्य निर्मिती करून केला. या उपक्रमात प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हीरो हीरोइन पोशाख घालून सहभाग नोंदवला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला चालना मिळाली.

 
Top