उमरगा (प्रतिनिधी)- येत्या आक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकिसंदर्भात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असलेले उमेदवार दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष (कॅबिनेटमंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे स्वीय सहायक सन्माननीय सातलिंग स्वामी हे असून त्यांना मतदानरूपी सहकार्य करण्याचे ठाम आश्वासन मुस्लिम बांधवांनी यावेळी दिले.
प्रारंभी मुस्लिम बांधवांतर्फे सातलिंग स्वामी यांचा शाल, मानाची टोपी, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, उस्मान भालके, महेबुब मुल्ला, मुसा खजुरे महमूद नागुरे, मैनोद्दिन काझी, रसूल शेख, सलीम मकानदार, आदम भाई देशमुख, शिराज मुनशी, मदार भालके, फिरोज शेख, मशाक खजुरे, युनुस मुल्ला, अब्दुलकादर कोकळगावे, अखिल मुल्ला, सैफ मुल्ला, जाफर मुल्ला, आयुब मुनशी, फिरोज मुजावर, पिंटू जमादार, शाहिद काझी, इस्माईल नागुरे, रियाज मुल्ला, शहानवाज कोकळगावे, साहेब मुल्ला, बबलू जमादार, अखिल मुल्ला, सैफ मुल्ला, सरफराज खजुरे, ताहेर शेख, मेहबूब शेख, कार्यक्रमाचे आयोजक अजिम खजुरे आदींसह मोठ्या संख्येने येणेगूर गाव आणि परिसरातील मुस्लिम समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या.