भूम (प्रतिनिधी)- भूम येथील  एसटी आगारातील वाहतूक नियंत्रक अंगद पिंपळे यांचे सेवानिवृत्ती निमित्त भूम येथील मंगल कार्यालय येथे सहपत्नीक सत्कार करण्यात आला.पिंपळे बत्तीस वर्ष एसटी महामंडळात सेवा करून निवृत्त झाले. त्यांनी अगोदर चालक म्हणून किती 30 वर्ष सेवा केली व नंतर दोन वर्ष भूम एसटी स्टँडवर वाहतूक नियंत्रण सेवा केली व निवृत्त झाले. यावेळी कामगार संघटनेचे नामदेव नागरगोजे, वैभव हराळ, तसेच एस. एस. सुरवसे, नागेश गायकवाड, धनंजय माळी, वैभव मुळे, डॉ. मनीष गुळवे, महेश शिंदे, एम. आर. सानपयांच्यासह एसटी आगाराचे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top