धाराशिव (प्रतिनिधी)- येथील बसस्थानकात मागील आठवड्यातील चिखलमय रस्त्यावरूनच एसटी बसचा प्रवास सुरू होता. यामुळे चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत होती. अनेक बस जुन्या असल्याने चिखलात रूतून बंद पडत होत्या. याबाबत आमदार कैलास पाटील यांनी बसस्थानकाला भेट दिली. यावेळी प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नाही, चांगला रस्ता नाही, असे असताना एसटीचे अधिकारी काय करतात असा सवाल करत एसटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. 

त्यानंतर गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पावसाने उघडीप दिली. धाराशिव बसस्थानकात चिखलमय रस्त्यावर टिप्परद्वारे मुरूम, दगडगोटे टाकण्याचे काम सुरू झाले. तसेच बसस्थानकात पाणी साचलेल्या ठिकाणी व चिखल झाला तेथे मुरूम टाकून रूंदीकरणाचे कामही सुरू झाले आहे. 

 
Top