कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगाराच्या सर्वच बस अगदी खुळखुळ्या गत झाले असून आहेत त्याही बस नीट नाहीत काही बस वाटेतच बंद पडतात तर काही बस गळक्या, खिडक्या नसलेल्या ,वायपर नसलेल्या असल्यामुळे वाहक चालक यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच कळंब  आगाराची बस कळंब  ते मुरुड ही बस  रात्री मुरुड मुक्कामी जात असताना वाटेतच पाऊस आल्याने या पावसामुळे बसमधील सर्व प्रवासी भिजून चिंब झाले. अशातच एका प्रवाशाने वाहक, चालक यांना जबाब विचारून तुम्ही गळक्या बस का आणता म्हणून वाहक चालकास बेदम झोडपले.  या वाहक चालकाने मुरुड पोलीस ठाण्याला तात्काळ कळवून प्रवाशाला बेड्या घातल्या. या घटनेमुळे कळंब व लातूर आगारात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की कळंबा घराची कळंब  ते मुरुड मुक्कामी बस  क्रमांक एम एच 20 बी एल  148 ही बस वाहक पठाण चालक राऊत हे मुक्कामी मुरुड साठी जात असताना दि. 9  रोजी रात्री शिराढोण च्या पुढे गाडी मार्गस्थ होत असताना पावसाने सुरुवात केली. या जोराच्या पावसाने बसमधील प्रवासी खिडकी अभावी व छत गळत असल्याच्या कारणाने सर्व प्रवासी भिजून चिंब झाले. त्यातील एका प्रवाशाने वाहक, चालक यांना या गळक्या बस का वापरतात म्हणून वाहक, चालक यांना चांगलीच मारहाण केली. या मारहाणीत वाहकाचा डोळा तर चालकाचे डोके फुटले. या बेदरलेल्या अवस्थेत प्रवाशांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाला धरून ठेवले व वाहक पठाण यांनी मुरुड पोलीस स्टेशन गाठून सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रवासी करण कचरू मस्के रा. चव्हाणवाडी ता. जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत पाठवले. वाहक, राऊत व चालक पठाण यांच्या फिर्यादीवरून मुरुड या पोलीस ठाण्यात मारहाण करणारे तरुणा विरुद्ध कलम 353, 324, 504 भादविप्रमाणे गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा पुढील तपास मुरुड  पोलीस करत आहेत. 

              

ही घटना कळंब आगारात कळताच कळंब आगारातील वाहक चालक यांनी सोमवार दि. 10 जून रोजी बसला वायपर, खिडक्याला काच नसलेल्या गाड्या नाकारून चव्क जवळपास 5 हजार  किलोमीटरच्या फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.  याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा सवाल ही प्रवाशातून उपस्थित केला जात आहे.  तर या कामचुकार कर्मचाऱ्यांना कोणी लगाम घालेल का असाही सवाल प्रवाशातून जोर धरत आहे.  या फेऱ्या रद्द का केल्या याबद्दल वरिष्ठ अधिकारी काही दखल घेणार का? ज्या कर्मचाऱ्यांनी बस गाड्या वेळेवर दुरुस्त केल्या नाहीत अशावर काही कारवाई होणार का ? सवाल प्रवाशातून विचारला जात आहे. कळंब बस आगाराला नवीन बस मिळणार का? का जुन्या बसमुळे वाहक चालकात व प्रवाशात हाणामारी पुन्हा होणार ? असा सवाल ही उपस्थित होत आहे.

 
Top