तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वाडयाचा 10 वा वर्धापनदिन महाराष्ट्र कुंभार समाज बांधव यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

सकाळी श्री संत गोरोबा काकांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला.यानंतर हभप दिपक महाराज खरात यांचे प्रवचन संपन्न झाले.यानतर कुंभार समाजातील महीलानी भजन , अभंग सादर केले. सूत्रसंचालन प्रकाश कुंभार यांनी केले तर आभार नागनाथ कुंभार यानी मानले.यावेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक मोहन जगदाळे, प्रदेशाध्यक्ष श्यामशेठ राजे, अखिल भारतीय प्रजापती महासंघाचे उपाध्यक्ष नागनाथ कुंभार,माती कला सेलचे अध्यक्ष दत्ताजी डाळजकर,विटभट्टी संघटनेचे अध्यक्ष बळवंतराव कुंभार, धाराशिव जिल्हाध्यक्ष महादेव खटावकर व राज्यातील कुंभार समाज बांधव उपस्थित होते.

 
Top