धाराशिव (प्रतिनिधी)- अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुली आयटी सारख्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्या कामकाजाच्या दैनंदिन वेळा या रात्री अपरात्री आहेत. त्यामुळे शहरात मुलींना स्वसंरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींना लाठी काठी प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डडॉ. विक्रमसिंह माने यांनी केले. यावेळी मुलींच्या वस्तीगृहामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वस्तीगृहातील मुलींनी उत्स्फूर्तपणे आंबा, चिकू, सीताफळ यासारख्या वृक्षाचे वृक्षारोपण करून संवर्धन करणार असल्याचे सांगितले.

येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व लाठी काठीचे प्रशिक्षण, फळ वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उमरग्यातील कोच मोहम्मद रफी हे उपस्थित होते. त्यांनी मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षण करणे का गरजेचे आहे याविषयी माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, डॉ. प्रशांत कोल्हे, प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. शितल पवार, डॉ. सुशीलकुमार होळंबे, प्रा. संदीप टेकाळे, प्रा. अभिजीत बोरकर, प्रा. सुनिता गुंजाळ, हेमंत निंबाळकर, सरला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top