कळंब (प्रतिनिधी) -  कळंब बसआगार वाहतूक नियंत्रक जालिंदर नन्नवरे यांच्या सेवापूर्ती निमित्त  दिनांक 1 जून 2024 रोजी श्री दत्त मंदिर सभागृह येथे कळंब बस आगार व्यवस्थापक बालाजी भारती यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

याप्रसंगी  वाहतूक अधीक्षक बालाजी मुळे, वाहतूक निरीक्षक अनंत कवडे, वारकरी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष हभप. बळीराम कवडे महाराज, ईपीएस-95  सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे नेते अच्युतराव माने, ज्येष्ठ नागरिक महा संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. महादेव महाराज अडसूळ, तालुका सचिव माधवसिंग राजपूत, एसटी कामगार संघटनेचे कल्याण कुंभार, चर्मकार महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास कदम, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक कदम, चर्मकार महासंघ जिल्हा महिला अध्यक्षा आशा सुरवसे यांची उपस्थिती होती.

नन्नवरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची उस्मानाबाद, भुम, कळंब व बसआगार येथे वाहक व कळंब बस आगार येथे वाहतूक नियंत्रक अशी 35 वर्ष 22 दिवस सेवा पूर्ण केली आहे. यानिमित्त उपस्थित मान्यवर, बसआगार कर्मचारी व मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या वतीने जालिंदर नन्नवरे यांचा फेटा, शाल, पुष्पहार तसेच पूर्ण पेहराव देऊन सत्कार करण्यात आला. सेवापूर्ती व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव केला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना  जालिंदर नन्नवरे यांनी सेवाकाळात अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी सहकार्य केले. यामुळे एस टी महामंडळाची व प्रवाशांची सेवा करता आली पुढील आयुष्यातही सामाजिक सेवेत सक्रिय राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी व आभार सायस खराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशील हुंबे, चेतन गोसावी, महेश थोरबोले, शिवाजी बांगर, हनुमंत पुरी, दत्ता मुंडे, गणेश काळे, श्रीमती शिंदे सरोजा औसेकर, वंदना पालके यांनी परिश्रम घेतले.


 
Top