तुळजापूर (प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुक प्रचंड चुरशीची झाली असून, आता निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होवुन लागणार आहे.  श्री तुळजाभवानी मातेने आपल्याला विजयी करावे, असे साकडे घालण्यासाठी व देवीचा आशिर्वाद आपणास मिळावा म्हणून महाराष्ट्रा बरोबर कर्नाटक, आंध्र, तेलगंणा, मध्यप्रदेश येथील सर्वच पक्षाचे उमेदवार देवीदर्शनार्थ गर्दी करीत आहेत. मंगळवार पहाटे पर्यत उमेदवारांची गर्दी अशीच राहणार आहे.

ङी तुळजाभवानी मातेचा वार मंगळवार  असल्याने  श्रीतुळजाभवानी माता कुण्याच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे मंगळवार दुपार पर्यत स्पष्ट होणार आहे. आजपर्यत केंद्रीय मंञी रावसाहेब दानवे, खा. हेमंत पाटीलसह अनेक महत्त्वाच्या उमेदवारी देवी चरणी हजेरी लावुन विजय मिळू दे असे साकडे घातले.

 
Top