तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील आपसिंगा गावातील हुतात्मा स्मारक ते वेशी गल्ली रस्ता मंजुर होवुन ही त्याचे काम सुरु केले जात असल्याने  काम सुरु न होण्यामागे काय कारण आहे असा सवाल ग्रामस्थांमधुन केला जात आहे. काम वेळेवर सुरु न झाल्याने याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत झाल्याची चर्चा आहे. 

तुळजापूर पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर जवळपास आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. हा रस्ता मागील वीस वर्षापासून केलाच नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा रस्ता कागदावर तर केला गेला नाही असा सवाल केला जात आहे.  सदरील रस्ताची चार ते पाच महिने वर्क ऑर्डर निघुन झाली असुन तरी देखील संबंधित काम चालू करत नाहीत. या बाबतीत सार्वजनिक बांधकाम अभियंता केत यांना विचारणा केली असता ते चालु होईल ऐवडच उत्तर देत आहेत.या रस्ता दुरावस्थेमुळे लोक चांगलेच ञस्त झाले आहेत. सध्या सातत्याने या रस्त्यावर किरकोळ अपघात घडत आहेत. आतातरी हे रस्ता काम सुरु करुन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.

 
Top