तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या मंदिराचा गाभारा व मंदिर परिसराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. श्री तुळजाभवानी देविजींचे सिंहासन सोने-चांदीचे बनविण्यात येणार आहे. हे करताना श्रीतुळजाभवानी मुख्य  गर्भगृहास मुळरुप दिले जाणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदीर प्राचीन असे बारावे शतकातील आहे. या मंदीराचे बांधकाम पुर्ण दगडाचे आहे. सद्य स्थितीत प्रतिदिन 70 हजार व गर्दीच्या दिवशी लाखभर भाविक येत असल्याने सध्या मंदीर परिसर अपुरा पडत आहे. मंदीर परिसरातील ओवऱ्या मागे घेवुन परिसर वाढविण्यात येणार आहे. यामुळे मंदीर परिसर जागेत दुप्पट वाढ होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील सिंहासन सोने- चांदीचे करण्यात येणार आहे. मंदीर गर्भगृहातील जुन्या दगडी फरशीवर मार्बल बसविण्यात आली होती. ती काढुन गर्भगृहाला पुरातन रुप देण्यात येणार आहे. यातील चिरलेले दगड बदलण्यात येणार आहेत. मंदीर गर्भगृहाचे पुणतः  पुरातन रुप आणले जाणार आहे.

मंदीर पुरातन असुन मंदीरात जा-ये करण्यासाठी असणारे दरवाज्यांची रुंदी कमी असल्याने मंदीरातील पितळी सिंह चोपदार दरवाजा येथुन ये-जा करण्यासाठी भाविकांना प्रचंड ञास होतो. या पार्श्वभूमीवर मंदिरातील दोन दारे मोठे म्हणजे दहा ते बारा फूट रुंदीचे करण्याचे नियोजन आहे. मंदीर बदल हा पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत. या कामाचे बजेट 55 कोटी रुपये आहे. या संदर्भातील प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. या बरोबरच मंदिर परीसरात ही विकास कामे केली जाणार आहे.

 
Top