तुळजापूर  (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी  दर्शनार्थ शुक्रवार दि.14 जून रोजी दुर्गाष्टमी दिनी भाविकांनी गर्दी केली होती.  श्रीतुळजाभवानी मंदीर गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची रोषणाई करण्यात आली होती. पहाटे ऐक वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनार्थ आरंभ झाला पहाटे पासुन दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.

आज दिवसभर विविध दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. आज भाविकांच्या संखेत काहीशी घट जानवली. 15 जून ला शाळा सुरु होणार असल्याने  नंतर भाविकांच्या संखेत आणखी घट होणार आहे.

 
Top