तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षातर्फ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाअध्यक्ष अमीर शेख यांनी त्यांचा शैक्षणिक साहित्य भेट देवुन सत्कार केला. सत्कार स्विकारल्यानंतर त्यांनी माझा सत्कार करताना हारेतुरे यावर खर्च न करता माझ्या मतदार संघातील विध्यार्थांना शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य देवुन सत्कार करावा. म्हणजे यात गोरगरीब विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणापासुन वंचित राहणार नाहीत असे आवाहन केले.

 
Top