तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र पंढरपूर देवस्थान कमी खर्चात आपल्या मंदिराचे पुरातन रुप कायम करीत आहे. तिर्थक्षेत्र तुळजापूरचे देवस्थान मात्र पुरातन अमुल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करुन नवे खर्चिक विकास कामे करण्याचा प्रयत्न करीत असल्याने जुन्या सारखे नवे विकास कामे टिकणार का? असा प्रश्न भाविकांमधुन विचारला जात आहे.

तिर्थक्षेत्र तुळजापूर श्री तुळजाभवानी मातेचे देवस्थान मुस्लीम धर्मिय निजाम ताब्यात असताना त्याने हिंदू भाविकांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी केलेले कामे शेकडो वर्षानंतर ही भाविक त्यांचा वापरत आहेत. त्यात पाणीपुरवठा साठीच्या विहरी, आडे, कुंड आजही वापरत आहेत. मात्र तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत 225 कोटी रुपये खर्चुन केलेली विकास कामे आज भाविकांसाठी वापरत आहेत का हा शोधाचा विषय आहे.  ड्रेनज लाईन, सिग्नल यंञणा, मंदिराला पुरातन रुप येण्यासाठी महाद्वारासमोर केलेल्या दगडी पायऱ्या, स्वछतागृह, कचरा कुंड्या, शौचालय, पाणी वितरण, रस्ते यावर 225 कोटी खर्च केला. याचा किती वापर भाविकांना होता हा शोधाचा विषय आहे. श्री तुळजाभवानी मंदिराचे जुने महाद्वार पाडुन नवे केले गेले. महाद्वार बांधताना श्रीकल्लोळ गोमुख तिर्थकुंड पाणी स्ञोञावर बांधकाम केले. आज काय झाले तर श्रीकल्लोळ गोमुख तिर्थकुंडाचे पाणी गायब झाले.

सध्या  घाटशिळ वाहनतळ जवळ भवानी तिर्थकुंड अकरा कोटी खर्चुन बांधले आहे. पण आज त्याचा वापर नवरात्रोत्सवात होतो. पाऊस कमी पडला कि त्याचा वापर होत नाही. हे अकरा कोटी मंदिरालगत पुर्वी स्नानासाठी असणाऱ्या मंकावती कुंड जिर्णोध्दारासाठी केले असते तर खर्च वाचला असता. पुरातन मंकावती कुंडातील नैसर्गिक पाण्यात भाविकांना स्नान करता आले असते. पण तिर्थक्षेत्री जुने सोडुन नव्याच्या मागे लागयाची वृत्ती संबंधितांची बनल्याने नवे करण्यात प्राचीन जुना पुरातन ठेवा नष्ट करण्याचे काम सुरु असल्याची चर्चा शहारवासियांमधुन केली जात आहे. 

 
Top