कळंब (प्रतिनिधी)-तालुक्यातील शेतकरी अधिच संकटात आहे यातच या भागातील ऊस गाळप केलेल्या अनेक कारखानदाराने शेतकऱ्यांनी ऊस देखके पेरणी आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात तोंडाशी आलेली असतानाही कारखान्याने अदा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडलेली आहे.  तातडीने ऊस बिल द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. प्रवीण यादव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी  यांच्याकडे एक निवेदनाद्वारे केली आहे . 

या निवेदनात म्हटले आहे की कारखाने शेतकऱ्यांची ऊस देयके थकवली असल्याने शेतकरी मोठ्या संकटात असल्याचे म्हटले आहे. त्यातच कष्टाने पिकवलेल्या व कारखान्याला घातलेल्या ऊस गाळपासाठी त्याची रक्कम अद्याप मिळालेले नाही.सध्या पेरणीची लगबग सुरू आहे. तसेच आगामी शैक्षणिक  वर्षाची सुरुवात झाली आहे. या दोन्ही कामासाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. शेतकरी अडचणीत असल्याने ज्या कारखान्याने 15 फेब्रुवारी पर्यंत व नंतरच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाची रक्कम थकवली आहे. त्यांना थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खाती तात्काळ जमा करण्याच्या सूचना प्रशासनाने द्याव्यात अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.  याविषयी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असेही प्रवीण यादव यांनी या निवेदनात म्हटले आहे.

 
Top