धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

धाराशिव येथे मराठा बांधवांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा 8 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. धाराशिव येथील मराठा बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यात सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेची अंमलबजावणी कराव, मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट लागू करा, शिंदे समितीस मुदतवाढ देत काम सुरू ठेवा, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांची माहिती प्रसिध्द करा आदी मागण्या केल्या. 


 
Top