मुरुम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे नूरअहमद घाटवाले यांचा सेवापुर्ती दिन व संत कबीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समितीने शनिवारी (ता. 22)  रोजी प्रशालेच्या सभागृहात निरोप समारंभ व गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे होत्या. 

यावेळी डॉ. इब्राहीम नदाफ (बीड), प्रा. डॉ. अर्जुन डोके (पुणे), शशिकांत जोकार (सांगोला), उमरगा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंखे, मुरुम बीटचे विस्तार अधिकारी जीवराज पडवळ, मुरुमचे केंद्र प्रमुख कमलाकर मोटे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, शालेय समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे, शिक्षक संघटनेचे महेश कांबळे, शिवाजी कवाळे, संत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे, प्रा. सद्दामहुसेन घाटवाले, धनराज शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जिवराज पडवळ, धनराज फुरडे मधुकर ममांळे, महादेव पाटील, विठ्ठल गायकवाड, महेश कांबळे, नीलकंठ बशेट्टी आदींनी मुख्याध्यापक घाटवाले यांच्या शैक्षणिक-सामाजिक कार्याबाबत व त्यांची जन्म व कर्मभूमी काटगाव ते उमरगा, उमरगा ते मुरूम पर्यंतच्या वाटचालीचा लेखाजोखा विविध प्रसंगानिहाय मनोगतातून व्यक्त केला. यावेळी घाटवाले यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करताना सहशिक्षीका डॉ. वंदना जाधव म्हणाल्या की, सेवापुर्तीनिमित्त स्वतःच्या कार्याचा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याचे भाग्य खूप थोड्या लोकांच्या नशिबात असते. ते भाग्य आज घाटवाले यांना लाभले आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा गौरव ग्रंथ कसा असेल याची सर्वांना उत्सुकता होती. त्या ग्रंथाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. श्री. घाटवाले यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, मी काटगाव, ता. तुळजापूर येथील साधारण कुटुंबात जन्मलो. ज्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो. त्याच शाळेत मी शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर त्याच शाळेत मला मुख्याध्यापक म्हणून काम करता आले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. शाळेतील सहशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सोनाली कलशेट्टी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे तर आभार महादेव कुनाळे यांनी मांनले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

 
Top