धाराशिव (प्रतिनिधी)-बार्शी येथील रहिवासी असलेले प्रसाद देटे यांनी मराठा समाजास आरक्षण न दिल्याकारणाने आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक आंदोलन, रस्ता रोको वेळी प्रसाद हे सक्रिय राहून समाज बांधवांसाठी काम करत होते.त्यांच्या राहत्या घरी जाऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी प्रसाद देटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.

मराठा समाजात तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. आत्महत्या आरक्षण मिळविण्याचा पर्याय असू शकत नाही. तसेच आपल्या पाठीमागे कुटुंबीय आहे याचा जरूर विचार करावा. असे मराठा समाजातील युवकांनी असे टोकाचे पाऊल उचलून असी कळकळीची विनंती समाज बांधवांना केली आहे.

 
Top