धाराशिव (प्रतिनिधी)- ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला घालू नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथे शंकरराव कराड,नानासाहेब मुंडे दोघांनी अमर उपोषण सुरू केले होते. समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत व तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, समता परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष बिभिषण खुने यांचे शिष्टमंडळाने गोविंदपूर येथे भेट दिली. त्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी मोबाईलवरून बोलणे करून देवून भुजबळ उपोषण मागे घेण्याचे सांगितले. त्यानुसार पाचव्या दिवशी मुंडे, कराड यांनी उपोषण मागे घेतले आहे. 

याप्रसंगी समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष डोरले, धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष सचिन देशमाने,समता परिषदेचे कळंब तालुका अध्यक्ष जयदेवराव गोफणे, शशिकांत खुने, भाऊसाहेब ओव्हाळ, शाम गायकवाड हनुमंत पंडीत, सुशिल झांबरे, अंगद माळी, लालासाहेब माळी यांच्यासह ओबीसी समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top