तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मंगळवार रोजी भरणाऱ्या आठवडा बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. आता ग्रामीण भागातुन बाजार करण्यासाठी आलेल्या  बाजारकरुंच्या दुचाकी भरदिवसा चोरटे नेत असल्याची घटना दि. 21 मे 2024 रोजी घडल्याने आठवडा बाजार परिसरात वाढणारा चोरट्यांचा सुळसुळाट रोखण्याची मागणी होत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे दर मंगळवारी हाडको मैदाना जवळ आठवडा बाजार भरतो येथे पंचक्रोषीतील जवळपास वीस ते बावीस गावचे लोक बाजारासाठी येतात तर पंधरा हजार च्या आसपास ग्रामस्थ येथे बाजार करण्यासाठी येतात.

तुषार व्यंकट जाधव, व, रा. महाळंगी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे वीस हजार रूपये किंमतीची हिरो स्पेलंडर मोटरसायकल क्र. एमएच 25 वाय 9032 ही 21/5/2024 21 रोजी 18.00 ते 18.10 वा. सु. कन्या शाळा आठवडी बाजार तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.  तुषार जाधव यांनी सदरील चोरीची फिर्याद  दि. 02.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top