धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील अळणी येथील खेळाडू कु. योगिनी साळुंके हिची चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पेंटॅथलॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड झालेली आहे. तिला सदरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रोटरी क्लब उस्मानाबाद व रोटरी सेवा ट्रस्टच्या वतीने सत्कार करून अर्थसहाय्य देण्यात आले.

जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय धाराशिव येथे दिनांक 29 में 2024 रोजी कु. योगिनी साळुंके हिचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनार रवींद्र साळुंके व सचिव डॉ. मीना श्रीराम जिंतूरकर  यांच्या हस्ते निधी प्रदान करण्यात आला. या वेळी रोटरी क्लब उस्मानाबादचे 2024-25 चे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर, सचिव आनंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top