तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील तीर्थ खुर्द येथील मंदीरे व  सार्वजनिक जागेत मध्ये  अतिक्रमण केल्याने ते हटवण्याबाबत बुधवार दिनांक 29 मे रोजी गटविकास अधिकारी व पोलीस स्टेशन यांना  ग्रामपंचायतने  पत्र देवुन  अतिक्रमण करणाऱ्यांन वर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तुळजापूर तालुक्यातील मौजे तीर्थ खुर्द येथील मारुती मंदिरालगत पञाच्या शेड मारुन अतिक्रमण केले आहे. तर एका महाभागाने चक्क खंडोबा मंदीरात माल ठेवुन कुलुप लावले आहे.  तसेच  ग्रामपंचायत खुले जागेत सखाराम वाघमारे  यांनी  बांधकाम केले आहे. गेल्या सात महिन्यापासून या जागेवर अतिक्रमण केले असून याबाबत गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे येथील रहिवासी राम कानाडे यांनी वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नाही. अखेर बुधवार दि 29 मे  रोजी ग्रामसेवक व सरपंच यांनी राम कानाडे यांच्या पत्राचे दखल घेऊन शासकीय जागेवर अतिक्रमण होत असल्याने तुळजापूर गट विकास अधिकारी व पोलीस स्टेशन येथे अतिक्रमण हटवण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. तरी प्रशासन हे अतिक्रमण कधी हटावणार या कडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

 
Top