धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग सेना महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी तसेच धाराशिव लोकसभा व मराठवाडा विभागपदी सुनील रामराव शेरखाने यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते शेरखाने यांना मंगळवारी (दि. 25) देण्यात आले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने अखिल भारतीय शिवउद्योग सेना महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशमुख यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबयांच्या आदेशाने ही निवड केली आहे.

शिवसेना पक्षाच्या ध्येयधोरणानुसार व संघटनेच्या उद्दिष्टानुसार आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करावा. संघटनेतील सर्वांना एकत्रित घेऊन कार्य करावे, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे शहर संघटक रणजित चौधरी, उपशहरप्रमुख रजनीकांत माळाळे, युवा सेना शहरप्रमुख सागर कदम, व्हीजेएनटी विभागाचे शहरप्रमुख आकाश माळी, अमर माळी, विशाल हिंगमिरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top