धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने मागील दोन वर्षापुर्वी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करुन सहकाराला वेगळे स्थान देवून सहकार म जबूत करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे सध्या स्थितीत देशातील जास्तीत जास्त लोक सहकाराच्या माध्यमातून सहकारी बँकींग/वित्तीय संस्थामध्ये सहभागी व्हावेत, सहकाराची भक्कम पायाभरणी व्हावी, वित्तीय बाजाराच्या व्यवहारांविषयी माहिती व सामान्य ग्राहकांना नित्यनेमाने योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा आपल्या बँकेकडे आहे आणि आपण सर्व लोकांनी त्यामध्ये सहभाग वाढविल्याने आणि संचालक मंडळाने पथदर्शी धोरण समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होते असून दि.31 मार्चअखेर बँकेचा एकूण व्यवसाय 3 हजार कोटीच्या पुढे गेला असल्याचे माहिती उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी दिली आहे. ते आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, बँकेच्या प्रगतीबाबत व बँकेकडून ग्राहकांकरीता देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. बँकेचे अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे यांनी साल सन 2023- 24 या आर्थिक वर्षात संचालक मंडळाने केलेल्या बँकेच्या अर्थिक प्रगतीचा व कामगिरीचा आढावा सादर केला. त्यामध्ये सर्वप्रथम अहवाल वाचन व ताळेबंद व नफातोटा पत्रक बाबत तपशीलवार माहिती सादर केली. अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, कमी होणारी गुंतवणुक व्याजदरातील चढ-उतार व वाहणारी महागाई अशा अनेक आर्थिक कठीण परिस्थितीमध्ये अपवादात्मक पार्श्वभुमीवर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची दि.31 मार्च 2024 अखेर प्रगती पाहता बँकेचे एकुण भागधारक 76928 असुन, भागभांडवल रूपये 75.15 कोटी, निधी रूपये 460.98 कोटी, ठेवी रुपये 1855.16 कोटी, गुंतवणूक रूपये 1113.01 कोटी, कर्जे रूपये 1175.27 कोटी, बँकेचे एकुण कर्जदार 12979 व ठेवीदार 418338 इतके असुन बँकेचा एकुण व्यवसाय रुपये 2030.42 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. मागील वर्षाप्रमाणे या ही वर्षों निव्वळ एनपीए शुन्य टके आहे. चालू अर्थिक वर्षात 38.45 कोटी इतका नफा मिळवलेला आहे. संचालक मंडळ बँकेच्या सर्व सभासंदाना या वर्षी 8% लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. 

बँकेच्या 80 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा बैठकीस जेष्ठ सभासद सर्व संचालक मंडळ सदस्य, वैधानिक लेखापरिक्षक, कॉन्करंट/गुंतवणुक ऑडीटर व बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख, अशिष मोदाणी, सीए दिपक भातभागे, सीए विनोद साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके व आजी, माजी कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.

 
Top