धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई अजित पवार यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने  फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जयघोष करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. कार्यकर्ते यांच्यामध्ये काम करण्यात उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रधुरगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक,धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी,सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे, महीला जिल्हाध्यक्षा सरला खोसे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,महिला जिल्हाकार्याध्यक्ष अप्सरा पठाण,धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, सामाजिक जिल्हा सचिव नारायण तुरुप,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख, कळंब तालुका उपाध्यक्ष आगतराव कापसे, धाराशिव तालुका सरचिटणीस प्रकाश बालकुंदे,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर कार्याध्यक्ष अमिना शेख,धाराशिव विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष गणेश गुरव,बेंबळी शहराध्यक्ष अतिष मरगणे, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर उपाध्यक्ष सना शेख,धाराशिव सोशल मीडिया सुहास मेटे,केशेगाव गटप्रमुख लिंबराज लोखंडे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी उपस्थित होते.


 
Top