धाराशिव (प्रतिनिधी)- 10 वी नंतर मुले लातूर, औरंगाबाद, हैद्राबाद, कोटा अशा ठिकाणी जेईई व नीट च्या तयारीसाठी जातात. त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागते. धाराशिवमध्येच भोसले उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये दिल्ली, कोटा, हैद्राबाद येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून शाळेत आहेत. त्यामुळे पालकांनी आर्थिक नुकसान न करता मुलांना उच्च शिक्षण द्यावे असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

गुरूवार दि. 6 जून रोजी यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य पाटील, सरचिटणीस प्रेमा पाटील, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमुख, कटियार सर, कुमार सर, अजितसिंग सर, दानिश खान सर, संजय मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी वैष्णवी दादासाहेब हुंबे, रिया घाडगे, रजना माळी, अफिया पठाण, सृष्टी साळुंके, प्रताप सोनटक्के, ऋतुजा साळुंके, शिवराज देटे, प्रथमेश दिरगुले, अर्थव घार्गे, संतोष पाटील, ऋषिकेश केशव, मेघा उंडे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

दहावीनंतर धाराशिव येथून पुढील शिक्षणासाठी लातूरला गेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याचे सुधीर पाटील यांनी सांगून, आम्ही येथे विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेत आहोत. आमच्या येथील विद्यार्थी 75 टक्क्यापासून पुढे आहेत. तर लातूर येथे 99 टक्क्यापासून विद्यार्थी घेतले जातात. परंतु एमबीबीएस पुर्व परिक्षा नीटचा निकाल त्यांचा आणि आमचा सारखाच लागतो.  
Top