धाराशिव (प्रतिनिधी)- रयतेचे राजे म्हणून जनमाणसात स्थान मिळविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने ,कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनीता गुंजाळ, डॉ. प्रीती माने, प्रा.शितल पवार, प्रा.एस डी शिंदे, प्रा.सी. जी. नाव्हकर, रामेश्वर मुंडे, सविता नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की साडेतीनशे वर्षानंतर आजही शिवाजी महाराजांचा इतिहास रोमांचित करतो, प्रेरणा देतो. साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आजही तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात त्याच पद्धतीने  रायगडावर साजरा होत असतो. 18 पगड जातीधर्माचे, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणूनच ते छत्रपती झाले.  यावेळी कॉलेजचा विद्यार्थी जगदीश सुतार याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. जगदीश सुतार यांनी आपल्या बासरी वादनाने मंत्रमुग्ध केले. या निमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व  स्पर्धा घेण्यात आल्या.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये ऐश्वर्या सक्राते  प्रथम विजेती ठरली तर अश्विनी मोरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेमध्ये अस्मिता मेंढे या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक तर प्राजक्ता तांबारे हिला द्वितीय क्रमांक मिळाला.  यावेळी सागर सलगरे या विद्यार्थ्यांने छत्रपती शिवरायावरील आपला पोवाडा सादर केला. यावेळी झालेल्या क्रीडा स्पर्धेला ही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top