धाराशिव (प्रतिनिधी)- प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी तुळजापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना दिली.

साठे चौक धाराशिव रोड येथे अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत असून याचे क्ले मॉडेल तयार करण्यात आले आहे. ऑक्टोंबर पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून याठिकाणी बागबगीचा विकसित करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 5 कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून लवकरच यास मंजूरी अपेक्षित आहे.

याकामी माजी नगरसेवक किशोर साठे यांचा पाठपुरावा आहे. यावेळी विनोद गंगणे,  संतोष बोबडे, सचिन रोचकरी, पंडितराव जगदाळे, विशाल रोचकरी. विजय कंदले, नरेश अमृतराव, चंद्रशेखर भोसले, नारायण नन्नवरे, शांताराम पेंदे, अमर हंगरगेकर, अविनाश धैर्यशील पाटील, बाळासाहेब शिंदे, औदुंबर कदम, शिवाजीराव गायकवाड, नानासाहेब लोंढे, विनोद पलंगे तसेच मातंग समाज यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 
Top