तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.                                          

यावेळी मालोजी वाघमारे यांच्या सुंदर प्रार्थनेने योगदिनाची सुरुवात झाली.सर्व विद्यार्थीनी व शिक्षकांनी योगासने केली. सुशील क्षिरसागर यांनी सकारात्मक विचार, आनंदी वृत्ती, एकाग्रता यासाठी नियमितपणे योगासने करावे असे विद्यार्थीनींना आव्हान केले.मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी विद्यार्थ्यांकडून ध्यानधारणा करुन घेऊन महत्त्व सांगितले.यावेळी शाळेतील रामहरी पसारे,.काशीनाथ नरसाळे,  प्रतिभा जोगदंड,  पल्लवी पवार, ज्योती गाढवे सर्व शिक्षक वृंद यांनी योगासने केली.

 
Top