तुळजापूर (प्रतिनिधी)-  आलूर हे गाव महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले असून, या गावाची लोकसंख्या अठरा हजार ते वीस हजार च्या घरात आहे. परंतु या गावचे दुर्दैव असे कि, मृत झालेल्या देहाला सुद्धा नेण्यासाठी रस्ता नाही. ही गावची दुर्दशा असलेला ज्वलंत प्रश्न आहे. हा प्रश्न वारंवार आमदार, ग्रामपंचायत, वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांच्या जवळ वारंवार हिंदू - मुस्लिम समाजातील नागरिकांनी लेखी स्वरूपात वारंवार मांडलेले असून, रस्त्याचा प्रश्न वारंवार नागरिकांनी मांडून सुद्धा मी कित्येक वर्षापासून सुटत नाही. एखाद्या हिंदू किंवा मुस्लिम समाजातील एखादा नागरिक मृत झाला की त्याला नेण्यासाठी गुडघाभर चिखलातून पायपीट करावी लागते.  या प्रश्नाकडे आमदार आणि सरपंचाला वेळ द्यायला नाही का ? हा असा खडा सवाल  नागरिकांतून विचारला जात आहे. 

या प्रश्नाकडे येत्या पंधरा दिवसात आमदार आणि ग्रामपंचायतने लक्ष घातले नाहीतर लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढणार असा इशारा हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिकांनी दिला आहे. निवडणूक आल्या की, सरपंच व आमदार यांनी मोठमोठ्या घोषणा देऊन मोकळे होतात. परंतु यांच्याकडे विकास काम करण्यासाठी पुरेसा निधी नाही की करायची मानसिकता नाही असा प्रश्न जनसामान्यात पडतो. हिंदू-मुस्लिम स्मशानभूमीचा रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा यापुढे प्रेत ग्रामपंचायत पुढे ठेवून आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून दखल घेत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय किंवा स्मशानभूमीच्या रस्त्यावर प्रेत ठेवून आंदोलन करण्यात येईल. येत्या पंधरा दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

 
Top