धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी वडीगोद्री (जि.जालना) येथे आमरण उपोषणास बसलेले लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनार्थ ओबीसी बहुजन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिव येथे बुधवार, दि.19 जून रोजी लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. पार्टीचे संस्थापक प्रकाश (अण्णा) शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, प्रस्थापित मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नये, कुणबी मराठा नोंदी रद्द कराव्यात यासाठी वडीगोद्री (ता.अंबड, जि.जालना) येथे लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरु केलेले आहे. त्यांच्या मागणीला पाठींबा म्हणून ओबीसी बहुजन पार्टी धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपोषण आंदोलनात ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, अरुण जाधवर, पांडुरंग लाटे, जिल्हा संघटक रमाकांत लकडे, धाराशिव तालुकाध्यक्ष दिलीप म्हेत्रे, तालुका संघटक नागनाथ बोरगावकर, मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित, चंद्रकांत पवार, विठ्ठल चव्हाण, मनोज खरे, अनिल चंदने, गणेश एडके, बालाजी चादरे, बाळासाहेब सुभेदार, हरिदास वाघमोडे, बालाजी हुबाले आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top