तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे थाळीफेक स्पर्धेतील विजेत्यां खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

तेर ता. धाराशिव येथील क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांनी महाराष्ट्र संत विद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता आठवीच्या मुलींसाठी  थाळीफेक स्पर्धेचे आयोजन केले होते. थाळीफेक स्पर्धेतील विजेत्या समृद्ध जयराम माने, गायत्री गोकुळ सावतर, पल्लवी बापू माने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय या विजेत्यांना महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेंदरे, उषाताई मुळे, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, नरहरी बडवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

 
Top